पोद्दार हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या
मोफत अस्थिरोग शिबिरास उस्फूर्त प्रतिसादशिबिरात एकूण १९१ रुग्णांची तपासणी व उपचार
लातूर, दि. १९ : लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील सिग्नल कॅम्प परिसरातील पोद्दार हॉस्पिटल अक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटर मध्ये सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग शिबिरास अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण १९१ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आल्याचे रुग्णालयाचे संचालक डॉ. अशोक पोद्दार यांनी सांगितले.पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने प्रतिवर्षी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारच्या अस्थिरोग शिबिराचे
आयोजन करण्यात येते. आरोग्य सेवेत स्वतःला वाहून घेतलेल्या डॉ. अशोक पोद्दार यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून घेण्यात आलेले हे १३१ वे आरोग्य शिबिर आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या उपक्रमाचे औचित्य साधून डॉ. पोद्दार अशा प्रकारच्या अस्थिरोग व आरोग्य शिबिराचे आयोजन करून रुग्णसेवेचा आपला हा उपक्रम चालूच ठेवतात. दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधूनही ते दरवर्षी अशाच प्रकारच्या शिबिराचे नियमितपणे आयोजन करण्याकामी पुढाकार घेतात. कोरोनाच्या काळातही डॉ.अशोक पोद्दार व त्यांच्या टिमने रुग्ण तसेच सामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर तसेच सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून देऊन कोरोनापासून संरक्षण करण्याकामी अतुलनिय योगदान दिले आहे, हेही सर्वज्ञात आहे. गोरगरीब रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकामी डॉ. पोद्दार कायम अग्रेसर असतात. आजच्या या अस्थिरोग शिबिराचे उद्घाटन लातूर शहर मनपाचे आयुक्त अमन मित्तल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस अधीक्षक गणेश बारगजे हे होते. आयएमएच्या अध्यक्षा डॉ. सौ. सुरेखा काळे , युवा नेते अभिजीतभैय्या देशमुख यांची यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती .कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले. पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने सर्व मान्यवरांचे डॉ. अशोक पोद्दार, डॉ. इमरान कुरेशी यांनी स्वागत केले.यावेळी आपले विचार व्यक्त करताना आयुक्त अमन मित्तल यांनी डॉ. अशोक पोद्दार यांचे आरोग्य क्षेत्रातील कार्य अत्यंत
नेत्रदीपक असून कायम रुग्णसेवेत तत्पर असतात, हे आपण या शिबिराच्या निमित्ताने त्याचा प्रत्यक्ष अनुभवही घेतल्याचे सांगितले. डॉ. सौ. सुरेखा काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लातुरात आरोग्य शिबिराचा आगळा वेगळा पॅटर्न निर्माण करण्याचे काम डॉ. पोद्दार यांनी केल्याचे सांगितले. युवा नेते अभिजीतभैया देशमुख यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करताना पोद्दार हॉस्पिटल आणि परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. देशमुख आणि पोद्दार परिवारातील स्नेहाचे संबंध अशा उपक्रमांमुळे आणखी दृढ होत गेल्याची भावनाही अभिजित देशमुख यांनी व्यक्त केली. डॉ .अशोक पोद्दार यांनी आपले मनोगत व्यक्त
करताना मागच्या सलग अकरा वर्षांपासून आपण हा मोफत आरोग्य शिबिराचा उपक्रम राबवत असल्याचे नमूद केले. गोरगरीब व गरजू रुग्णांची सेवा करण्याच्या उद्देशाने आपण असे उपक्रम सातत्याने करीत असल्याचेही डॉ. पोद्दार यांनी सांगितले. यावेळी डॉ. पोद्दार यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची मोफत अस्थिरोग, फिजिओथेरपी , मशीनद्वारे हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना रुग्णांना उपलब्धतेनुसार मोफत औषधीही वितरित करण्यात आली. या शिबिरात सहभागी झालेल्या एकूण रुग्णांपैकी २७ रुग्णांची रक्त तपासणी व ५५ रुग्णांची सवलतीच्या दरात डिजिटल एक्सरे काढण्यात आले. ख्यातनाम अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अशोक पोद्दार, डॉ. इम्रान कुरेशी, डॉ. तुषार पिंपळे, डॉ. अतुल उरगुंडे या अस्थिरोग तज्ज्ञांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले. याप्रसंगी डॉ .चेतन सारडा, डॉ. दरडे, डॉ. संदीप कवठाळे , डॉ. दीपक गुगळे, डॉ. शिवपूजे , नगरसेवक कैलास कांबळे, प्रवीण घोटाळे, प्रसाद उदगीरकर, जयेश बजाज, लक्ष्मीकांत कर्वा यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिबिरात फिजियोथेरपीस्ट डॉ. पल्लवी जाधव, डॉ.
रेणूका पंडगे, डॉ. मयुरी शिंदे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भोसगे , डॉ. आशुतोष काटकळंबकर यांसह पोद्दार हॉस्पिटलच्या स्टाफ ने आपले योगदान दिले.या शिबिरास रुग्णांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
No comments:
Post a Comment