बीड : बीड जिल्ह्याची सुरक्षा आणि भविष्याविषयीची चिंता हा पंकजाताई मुंडे यांचा धर्म आहे, यासाठीच त्यांनी हा मुद्दा उचलून धरला. पण आज बीडची जी बदनामी होत आहे, ती केवळ तुमच्या नाकर्तेपणामुळे होत आहे असा टोला खासदार प्रितम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला आहे.
बीड जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे वास्तव पंकजाताई मुंडे यांनी मांडले, यात चुकीचे काय होते? हा प्रश्न केवळ पंकजाताईंनीच उपस्थित केला नाही तर सर्व जनता आणि माध्यमांनी देखील भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे. इतकंच नाहीतर तुमच्याच पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत या विषयावर आक्रमक लक्षवेधी मांडली, तरीही तुमचे डोळे उघडत नाहीत. जनतेला तुम्ही गृहीत धरत आहात का? असा संतप्त सवालही प्रितम मुंडे यांनी केला.पंकजाताई ७ तारखेला हॉस्पीटलमध्ये अॅडमिट होत्या. त्यांची एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली, त्यांची प्रकृती बरी नाही. पंकजाताईंना पातळी सोडून राजकारण करता येत असते तर त्या खूप बोलल्या असत्या. पण त्या तत्त्वाच्या राजकारणी आहेत. तुमचे आमदार लक्षवेधी आधी देतात, गावातील कार्यालयापासून ते तुमच्या कॅबिनपर्यंत माफिया राज आहे हे जगजाहीर आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या ज्या काही घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. ते तुमच्या कारभाराचे अपयश आहे. त्यावर चिंतन करायचे सोडून उलट पंकजाताईंवरच टीका करणे हे शोभते का? स्वतःच्या नाकर्तेपणाचे खापर दुसर्यावर फोडण्याची तुमची नेहमीचीच सवय आहे, अशी टीकाही प्रितम मुंडे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment