औरंगाबाद: हवामान विभागाच्या अंदाजानुसार अखेर मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, औरंगाबाद जिल्ह्यात पहाटेपासून अनेक भागात पावसाला सुरवात झाली. विजेच्या कडकडाटासह पाऊस धो-धो कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली असून, रब्बीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
कालपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. तर आज पहाटेच जिल्ह्यातील कन्नड,चापनेर, सोयगाव,बाजारसावंगी,करंजखेड,लोणी खु.,शिऊरसह अनेक भागात पावसाला सुरवात झाली आहे. कन्नड शहरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रब्बी हंगामातील हातात आलेलं पीकाच पुन्हा आवकाळीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
खरीपमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी रब्बीत गहू, हरभरा,कांदे,ज्वारीसह आदी पिके लागवड केली होती. तसेच विहिरीत पाणी असल्याने पिकं सुध्दा चांगली आली. पण आता काही दिवसांनी काढणीला आलेल्या पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसणार आहे. त्यात आंब्याला सुद्धा याचा फटका बसणार आहे. त्यामुळे आता पिकांच नियोजन कसे करावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
No comments:
Post a Comment