वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताने आपले गतवैभव पुनश्च प्राप्त करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी - latur saptrang

Breaking

Friday, March 25, 2022

वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताने आपले गतवैभव पुनश्च प्राप्त करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 25 : वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताचा जगभरात दबदबा होता. देशातील अनेक भागांना तेथील अनोख्या वस्त्रकलेमुळे वेगळी ओळख मिळाली होती. देश पारतंत्र्यात गेल्यावर या उद्योगाची पिछेहाट झाली. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये वस्त्रोद्योग क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचे कार्य सुरु आहे. देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी भारताने वस्त्रोद्योग क्षेत्रात आपले गतवैभव पुनश्च प्राप्त करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

‘ग्लोबल-स्पिन’ या वस्त्रोद्योग, हातमाग व तयार कपड्यांच्या 2 दिवसांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेचे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते जागतिक व्यापार केंद्र मुंबई येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी राज्यपालांनी पर्यावरण-पूरक हातमाग, पर्यावरण स्नेही वस्त्र व हातमाग वस्तूंच्या प्रदर्शनाला भेट दिली.

या वस्त्रोद्योग व्यापार परिषदेचे आयोजन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने केले असून आयएमखादी फाउंडेशन तसेच वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई या संस्थांचे आयोजनाला सहकार्य लाभले आहे.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, कार्यक्रमाला सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग राष्ट्रीय संस्थेच्या प्रमुख डॉ ग्लोरीस्वरुपा संचू, जागतिक व्यापार केंद्राचे अध्यक्ष विजय कलंत्री, आयएमखादी फाउंडेशनचे अध्यक्ष यश आर्य व राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेचे संचालक पवन गोडियावाला उपस्थित होते. वस्त्रोद्योग परिषदेच्या उद्घाटन सत्राला विविध देशांचे प्रतिनिधी तसेच राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.

भारतात वस्त्रोद्योगाची प्राचीन काळापासून परंपरा होती. प्रभू राम राजवस्त्रांचा त्याग करून वनवासाला निघाले त्यावेळी अनसूयेने त्यांना कधीही जीर्ण अथवा मलीन न होणारे वस्त्र दिले होते, याचे स्मरण दिले.  ढाका येथील मलमल साडी जगप्रसिद्ध होती, तसेच कांजीवरम, बनारस अशा विविध ठिकाणी वस्त्रोद्योग उच्चतम  सीमेला पोहोचला होता. वस्त्रोद्योग क्षेत्रात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारतर्फे ‘स्टार्ट अप इंडिया’ सारखे उपक्रम राबविले जात आहेत. या उद्योगातील ग्रामीण कारागिरांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे असे सांगताना लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांना नवसंजीवनी देऊन देशाला आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर करावे असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

०००

 

Governor inaugurates International Trade Conclave on Eco-Friendly Textile

 

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari inaugurated ‘GlobalSpin’ a 2 -day International Trade Conclave on Eco-Handloom, Eco-Textiles and Apparel at World Trade Centre in Mumbai on Friday (25 Mar). The Governor visited the exhibition of handloom products, textiles and eco-friendly apparel on the occasion.

Speaking on the occasion the Governor said India was a world leader in textiles having famous centres of muslin like Dhaka and other places. He called upon the captains of the textile industry to help to reclaim the past glory of the textile sector in India and make India a 5 trillion dollar economy.

The Conclave and Exhibition has been organised by the Ministry of Micro, Small and Medium Enterprises in association with the Ministry of Textiles, IAMKHADI Foundation and World Trade Centre, Mumbai.

Dr Gloryswarupa Sunchu, Director General of National Institute for Micro, Small and Medium Enterprises, Vijay Kalantri, Chairman, World Trade Centre, Yash Arya, Founder, IAMKHADI Foundation and Pavan Godiavala, Director, National Institute of Fashion Technology were present.

The Conclave is being attended by international delegates, captains of textile industry and students of NIFT.

000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/aDKc7MQ
https://ift.tt/TFPDefi

No comments:

Post a Comment