जगप्रसिध्द अजिंठा लेणी, पर्यटक केंद्र येथे वॉचमनला मारहाण करुन त्यांना खोलीत डांबून
यूसुफ पठान :- दरोडा टाकणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश दिनांक २४/०२/२०२२ रोजी फिर्यादी अंबादास रोडमल राऊत वय ५२ वर्ष, व्यवसायखाजगी नौकरी (सेक्युरिटी गार्ड इंचार्ज अजिंठा पर्यटक केंद्र, अजिंठा लेणी ) रा. शिवना ता. सिल्लोड जि. औरंगाबाद यांनी पोलीस ठाणे पैठण येथे फिर्याद दिली की, दिनांक २३/०२/२०२२ रोजी रात्री २१:४० ते दिनांक २४/०२/२०२२ रोजीचे ०५:१५ वाजेचे दरम्यान ११ अनोळखी चोरटयांनी फिर्यादीस मारहाण करुन, त्याचा मोबाईल फोडून सिक्युरिटी रुममध्ये डांबुन ठेवुन दोन ट्रान्सफार्मर मधील कॉपर वायर व ऑईल असा अंदाजे दोन लाख रुपये किंमतीचा मुद्येमाल जबरीने चोरुन नेला. वगैरे मजकुराचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे फर्दापुर येथे गु.र.नं १६/२०२२ कलम ३९५, ३९७, ३४७, ४२७ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक, श्री. निमित गोयल यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा मौजे वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना येथील इसम नामे (१) शेख शहारुख शेख नजीर वय २७ वर्ष व त्याचे इतर साथीदारांनी मिळून केलेला आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजे वालसावंगी येथे जाऊन सदर इसमाचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार नामे (२) अजीमखॉ सादिकखॉ वय ३६ वर्ष रा. वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना (३) शेख मुजीब शेख नुर वय ४२ वर्ष रा. वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना व इतर साथीदारांसह केल्याची कबुली दिल्याने नमुद आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून गुन्हयांत वापरलेली ४,००,०००/- रुपये किंमतीची महिंद्रा बोलेरो जिप क्रमांक एम.एच-४३-ए.डी-७४४० जप्त करण्यात आलेली असुन नमुद आरोपीतांना सदर गुन्हयाचे पुढील तपासकामी पोलीस ठाणे फर्दापुर यांचे ताब्यात देण्यात आले
आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, श्री. निमीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक, डॉ.पवन बनसोड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि विजय जाधव, प्रदीप टूबे, पोह बालू पाथ्रीकर, पोना राहूल पगारे, शेख नदीम, पोकॉ रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे, आनंद घाटेश्वर, संजय तांदळे, योगेश तरमाळे, जिवन घोलप यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment