स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर? - latur saptrang

Breaking

Monday, March 7, 2022

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर?

 




स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर?


मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याची शक्यता आहे. यासाठी विशेष ओबीसी विधेयक (OBC Bill) आज विधानसभेत मांडण्यात येणार आहे. या विधेयकानुसार राज्य सरकार निवडणुकीसंदर्भातील काही अधिकार हे स्वतःकडे घेणार आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर हे विधेयक आणलं जाणार असल्याची चर्चा आहे. (Local body elections to be postponed for six months the bill will come in maha assembly)

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकले जाण्याची शक्यता आहे. कारण प्रभाग किंवा वॉर्ड रचनेचे अधिकार स्वतःकडं घेण्याबाबतचे राज्य सरकार विधेयक मांडणार असल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशमद्ये निवडणुका पुढे ढकलण्याबाबत अशाच प्रकारचं विधेयक आणत सरकारनं निवडणूक आयोगाचे काही अधिकार स्वतःकडे घेतलेले होते. त्याच धर्तीवर हे विधेयक असेल. ते मंजुर झाल्यास सरकारला सहा महिन्यांचा अवधी घेता येणार आहे. यासंदर्भात आज बैठकही होणार आहे.

No comments:

Post a Comment