जिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीवर अशासकीय समितीवर संजय खैरनार यांची सदस्यपदी नियुक्ती
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संजय खैरनार यांचा सत्कार
नाशिक,दि.१८ मार्च :- नाशिक जिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीवर राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या शिफारसीनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहर सरचिटणीस संजय खैरनार यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. याबाबत संजय खैरनार यांना जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.
आज भुजबळ फार्म येथील कार्यालयात या निवडीबद्दल पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रुग्ण कल्याण समितीवर सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवा करावी अशा सूचना त्यांनी केल्या.
यावेळी प्रदेश सरचिणीस दिलीप खैरे, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, अॅड. चिन्मय गाढे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment