मनपाची शाळा क्रमांक ९ आता झाली सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय
लातूर/प्रतिनिधी:मुलींच्या शिक्षणासाठी ज्यांनी स्वतःचे आयुष्य वेचले आणि स्त्री सक्षमीकरणाचा पाया घातला त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव मनपाच्या शाळा क्रमांक ९ ला देण्यात आले आहे.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मनपाच्या वतीने हा सुखकर निर्णय घेण्यात आला.
मनपाची शाळा क्रमांक ९ ही विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात सतत अग्रेसर असते.शैक्षणिक गुणवत्ता कायम राखण्या सोबतच सोबतच विविध उपक्रमांमुळे या शाळेचा लौकिक वाढलेला आहे. प्रभागातील नागरिकांसह शहराच्या विविध भागातील विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात. स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या आणि स्वतःचे आयुष्य स्त्री सक्षमीकरणासाठी वेचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव या शाळेला देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता.विशेष म्हणजे महापौर विक्रांत गोजमगुंडे ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात त्याच प्रभागात ही शाळा आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवार दि.८ मार्च रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला.महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या उपस्थितीत नामकरणाचा सोहळा पार पडला.या कार्यक्रमास त्यांच्या सहकारी नगरसेविका पूजाताई पंचाक्षरी,सुभाष पंचाक्षरी यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षिका आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
उपक्रमशील शाळेला शाळेला सावित्रीबाई फुले यांचे नाव देऊन लातूर महानगरपालिकेने त्यांच्या कार्याचा अनोख्या पद्धतीने गौरव करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आणि नावाची प्रेरणा घेवून या शाळेतील विद्यार्थी देखील राष्ट्रकार्यात सहभागी होतील,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment