महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील गावांच्या समस्यांचा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घेतला आढावा - latur saptrang

Breaking

Thursday, March 24, 2022

महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील गावांच्या समस्यांचा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. 24- महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा शासनाचा महत्त्वाचा प्रकल्प असून दर्जाच्या दृष्टीने देशातील सर्वोत्तम प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामुळे कोपरगाव तालुक्यातील गावांमधील रहिवाशांना जाणवणाऱ्या समस्यांचा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी, कंत्राटदार तसेच स्थानिक रहिवाशांसमवेत स्थळ पाहणी करावी आणि समस्यांचे तातडीने निराकरण करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नागपूर ते मुंबईपर्यंतचे बांधकाम निरनिराळ्या 16 टप्प्यांमध्ये सुरू आहे. त्यापैकी अहमदनगर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील टप्प्याअंतर्गत कोपरगाव तालुक्यातील एकूण 10 गावांचा या प्रकल्पात समावेश आहे. या गावांतील रहिवाशांच्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीस आमदार आशुतोष काळे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता एस.के.सुरवसे, अधीक्षक अभियंता व्ही.आर.सातपुते यांच्यासह संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि संबंधित गावांतील रहिवासी उपस्थित होते.

उपरोक्त कामाच्या कोपरगाव तालुक्यातील टप्प्यात रस्त्यापेक्षा लगतची जमीन खोल असणे, विजेची तार जळून वीज बंद होणे, सर्विस रोड, बैलगाडी रस्ता तयार करणे, आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधणे अशा विविध समस्यांबाबत श्री.बनसोडे यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. रहिवाशांना वापरण्याजोगे रस्ते तयार करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

०००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/6gdRVFn
https://ift.tt/eGhgzQk

No comments:

Post a Comment