‘कांदळवनाचे संवर्धन’ या विषयावर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांची मुलाखत - latur saptrang

Breaking

Wednesday, March 30, 2022

‘कांदळवनाचे संवर्धन’ या विषयावर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांची मुलाखत

मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा कांदळवन कक्षाचे प्रमुख वीरेंद्र तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

ज्येष्ठ निवेदिक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.  गुरूवार, दि. 31 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर पाहता येईल.

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक – https://ift.tt/9aSklTH

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

राज्याला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणावर कांदळवन असून जैवविविधतेच्या दृष्टीने ही कांदळवने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. किनाऱ्यांची सुरक्षितता राखण्यासाठीही कांदळवने महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कांदळवनाचे पर्यावरणीय महत्त्व, कांदळवनाचे व्यवस्थापन, संरक्षण व संवर्धन कशाप्रकारे केले जात आहे तसेच कांदळवन कक्षाच्या कामगिरीविषयीची सविस्तर माहिती श्री.तिवारी यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/mC2SNu7
https://ift.tt/yIjGWN6

No comments:

Post a Comment