यवतमाळच्या महागाव येथील शिवभोजन केंद्राच्या गैरप्रकाराची मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दखल
शिवभोजन केंद्राचा परवाना रद्द करण्याचे आदेश
महागाव येथील शिवभोजन केंद्राचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी केला रद्द
मुंबई दि. 29 मार्च
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील त्रिमूर्ती महिला बचत गटातर्फे चालविण्यात येणाऱ्या शिवभोजन केंद्रावरील किळसवाणा प्रकार लक्षात आल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने या केंद्रावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार या शिवभोजन केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज 29 मार्च 2022 रोजी तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे.
यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की शिवभोजन केंद्र चालकांनी शिवभोजन चालविण्यासंदर्भातले नियम पाळलेच पाहिजे. कोणत्याही शिवभोजन केंद्रावर स्वच्छता नसेल तर त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल अशी देखील माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
महागाव तालुक्यातील शिवभोजन केंद्रातून अस्वच्छ पद्धतीने शिवभोजन थाळी वितरीत करण्यात येत असल्याबाबतिचे वृत्त प्रसार माध्यमातून समोर आले होते यानंतर तात्काळ या गोष्टीची दखल घेत मंत्री छगन भुजबळ यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यावेळी बोलताना श्री. भुजबळ म्हणाले की यापुढे असा प्रकार कोणत्याच शिवभोजन केंद्रावर खपवून घेतला जाणार नाही.
No comments:
Post a Comment