औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही -उद्योगमंत्री सुभाष देसाई - latur saptrang

Breaking

Sunday, March 27, 2022

औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही -उद्योगमंत्री सुभाष देसाई

 औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र 

थांबला नाही आणि थांबणार नाही

                            -उद्योगमंत्री सुभाष देसाई

ऑरीक सिटीत आंतरराष्ट्रीय उद्योगासाठी सर्व सुविधा उपलब्ध  

रोजगाराची संधी देणारी अशी ‘ऑरीक सिटीची’ओळख 

औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : आंतरराष्ट्रीय उद्योगांना गुंतवणूकीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणे हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. याअनुषंगाने ऑरीक सिटीमध्ये उद्योगांना गंतुवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. कोरोना कालावधीत देखील राज्यातील उद्योग सुरु राहीले. यातून महाराष्ट्राचा औद्योगिक विकास थांबला नाही आणि थांबणार नाही,असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ऑरीक सिटी हॉल येथे आयोजित औरा ऑफ ऑरीक, एफडीआय ॲण्ड टूरीझम कॉनक्लेव कार्यक्रमात सांगितले. 

या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उद्योग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी.अनबलगन,  त्याचप्रमाणे उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, सिंगापूरचे उच्चायुक्त चुआँग मिंग फुंग, उप उच्चायुक्त, झाच्चायुस लिम, जर्मनीचे मारजा-सिरक्का ईनिग, दक्षिण कोरीयाचे यंग ओग किम, इस्त्रायलचे कोब्बी शोशोनी, सुरक्षा अधिकारी योव्हेल बारुची, राहमीम होशबाती, नॅदरलॅण्डचे उच्चायुक्त अलबर्टस विलहोमस दे जोंग, रशियाचे उच्चायुक्त अलेस्की सुरोत्वेत्सव, तैवान चेबंर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष जेनिफर माखेचा, स्वीस बिझनेसचे व्यापार आयुक्त विजय अय्यर अदि देशाचे उच्चपदधिकारी उपस्थित होते.

औरंगाबाद शहरात विदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी आठ देशातील राजदुतांसमवेत ऑरिक सिटीत कॉनक्लेवचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात आले होते. आंतराष्ट्रीय उद्योग उभारणीसाठी संवाद व सहकार्य तसेच पायाभूत सुविधांच्या उपलब्धेतसह  ‘मेक इन इंडिया,’ ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या उपक्रमातून आंतराष्ट्रीय उद्योग उभारणीस सहकार्य आणि आवाहन करण्यात येत असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. गुंतवणूकदारासाठी दर्जेदार उत्पादन निर्मितीसाठी ऑरिक सिटी शिवाय पर्याय नाही.  पर्यटनात व उद्योगात आघाडीवर असलेले शहर म्हणून औरंगाबादने स्वत:ची ओळख बनवली असून अन्न प्रक्रिया उद्योगासाठी लवकरच आंतराष्ट्रीय उच्चायुक्त सोबत मंत्रालय स्तरावर बैठक नियोजित असून रोजगार आणि राज्याच्या निर्यातक्षम बाजारपेठ मिळण्यसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे देसाई यांनी सांगितले.


ऑरिक सिटीत विविध सुविधा उपलब्ध असुन दिल्ली-मुंबई कॅरिडॉर त्याचप्रमाणे हवाई वाहतुक, रस्ते वाहतुक, पायाभूत सोयी सुविधा अल्पदरामध्ये वीज पुरवठा अशा विविध सुविधाने औरंगाबाद इंडस्ट्रिलयल टाऊन शिपसाठी ऑरिक या नावाने विदेशी गुंतवणूकीसाठी विपणन केले जात आहे. यामध्ये विविध देशातील राजदूतांसमवेत राज्यात तसेच औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात उद्योग उभारणीसाठी असलेल्या सुविधा शासनाचे धोरण आणि परदेशी गुंतवणधारांना सहकार्य करण्यासाठी ऑरिक सिटीत कशाप्रकारे प्रयत्न करत आहे, याची माहिती उद्योग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी.अनबलगन यांनी दिली. 

No comments:

Post a Comment