मुंबई, दि. 7 : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने विविध क्षेत्रात ऊल्लेखनीय कामागिरी करणाऱ्या महिलांना “आदिशक्ती प्रेरणा पुरस्कार” देऊन गौरवण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण 8 मार्च रोजी दु. 4 ते 6 या वेळेत सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे पद्मश्री डॉ.इंदिरा हिंदुजा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
समाजात आपल्या कार्यामुळे विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, चूल आणि मुल सांभाळत कर्तबगारी दाखवणाऱ्या, आपल्या कार्याने इतर महिलांना प्रेरित करणाऱ्या महिलांचा आदिशक्ती प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
००००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/zUw0yhX
https://ift.tt/N1M73S5
No comments:
Post a Comment