बारामती; बारामती तालुक्यातील निंबुत येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना उद्देशून, बांधकामाच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत, पण त्यांना माहिती नाही राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. तिजोरीला चाव्या लावल्या तर बांधकामाला पैसे मिळतील नाही तर ते काय ‘घंटा’ देणार, असे व्यक्तव्य केले आहे.
पवार यांच्या या वक्तव्यानंतर जोरदार हशा पिकला खरा परंतु आपल्या विधानामुळे वाद होवू शकतो हे लक्षात येताच, ‘गाडी घसरायला लागली.आता थांबतो,’ असे म्हणत पवार यांनी भाषण आवरतं घेतले.
समता नागरी पतसंस्थेच्या समता पॅलेस वास्तूच्या उदघाटनप्रसंगी अजित पवार बोलत होते.
पवार म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दत्ता भरणे मंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यासाठी चांगला निधी आणला आहे. दत्ता भरणे यांना मला आमच्याही.बारामती तालुक्यावर लक्ष द्या असे सांगावे लागते. मला काही तरी द्या, अशी विनंती करावी लागते. ‘बांधकामाच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत. पण त्यांना माहिती नाही तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. त्या जर उघडल्या तर बांधकामाला पैसे मिळतील. मी तिजोरीच उघडली नाही तर त्यांना काय ‘घंटा’ मिळणार?’
No comments:
Post a Comment