बोरगांव बाजार (वार्ताहर)
कन्नड सिल्लोड रोड ते बोरगाव बाजारगाव रस्त्याचे काम मागील एक वर्षापासून चालू केलेले काम ठेकेदाराने अर्धवट स्थितीत सोडून बंद पडल्याने गावकऱ्यांचे व वाहन धारकांचे आतोनात हाल होत आहे.
सिल्लोड कन्नड रोड ते बोरगाव बाजार बस स्थानक या एक किलोमीटर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन माननीय महसूल राज्यमंत्री यांच्या हस्ते एक वर्षापूर्वी करण्यात आले होते व त्यानंतर लगेच जुलै महिन्यात या कामाची सुरुवात करण्यात आली होती,व यावेळी ठेकेदाराने या रोडचे काम अत्यंत निकृष्ट व थातूरमातूर करून लवकर उरकण्याच्या स्थितीत असताना सदरील काम बोगस होत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनात आल्यामुळे गावकर्यांनी हे काम तात्काळ बंद पाडले,पावसाचे दिवस असल्यामुळे दिवाळीनंतर करावे असे गावकरी व ठेकेदार यांच्यामध्ये ठरले होते त्यानंतर गाकऱ्यांच्या अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर हे कामआता तब्बल एका वर्षानंतर या कामाला मुहूर्त लागला व एक महिन्यापूर्वी चालू झाले होते तसे याकामा कडे ठेकेदाराचे नियमीच दुर्लक्ष राहिले आहे, आणि कशीबशी या कामाला सुरू झाली असताना बोरंगाव बाजार बस स्थानकावर ठेकेदाराने दहा ते पंधरा मीटर चे सिमेंट रस्त्याचे काम करून मागील पंधरा दिवसापासून आपले रोडवर काम करण्याचे सर्व साहित्य जमा करून पोबारा केल्यामुळे हे काम यावर्षी पण पुर्ण होते कि नाही असे गावकर्यातून उघडपणे बोलले व शंका व्यक्त केली जात आहे.व सदरील रस्त्याच्या अर्धवट कामामुळे बोरगाव बाजार गावात(एसटी) बससह अनेक वाहने गावात येत नाही तर गावकऱ्यांना कुठे बाहेरगावी जायचं असेल तर एक किलोमीटर पायपीट करून फाट्यावर जावे लागते या अर्धवट कामामुळे अनेक वाहनधारकांना व प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे अनेक वेळा तर वाहतूक ठप्प होते,
तरी संबंधित विभागाने सदरील अर्धवट पडलेले काम ठेकेदाराला लवकरात लवकर व दर्जेदार स्वरूपात करून सदरील रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी गांवकरी व वाहन धारकातून होत आहे...
No comments:
Post a Comment