चीनमध्ये कोरोनाचा स्फोट; एका दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद
जगातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं दिसत असताना चीनमध्ये मात्र यात झपाट्यानं वाढ होत असल्याचं समोर येत आहे. चीन, हाँगकाँग आणि व्हिएतनाममध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत आहेत. यामुळे चीनमधील अनेक शहरे लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. रविवारी चीनमध्ये एक हजार नव्या कोरोनान रुग्णांची नोंद झाली होती. त्यानतंर आज 5,280 नवे रुग्ण आढशसे आहेत. कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत चीनमध्ये एका दिवसात इतके रुग्ण पहिल्यांदाच आढळले आहेत.
गेल्या तीन दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे जिलिन प्रांतात आढळून आले आहेत. सध्या चीनमधील १० शहरं आणि काऊंटीत लॉकडाऊन करण्यात आले आहे. चीनचे टेक हब असलेल्या शेंझेन शहरातही कडक निर्बंध लागू केले आहेत. लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे चीनमधील १७ दशलक्ष लोक घरात अडकून पडले आहेत.
शांघायमध्ये शाळा, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल्स आणि व्यवसाय बंद आहेत तर बिजिंगमध्ये रहिवाशी भागात जाण्यावर बंदी घालण्यात आलीय. नव्या रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडू नये अशा सूचना दिल्या आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय शहरातून बाहेर जाऊ नये असंही सांगण्यात आलं आहे.
No comments:
Post a Comment