मुंबई, दि. 3 : ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज यांच्यासह विधान परिषदेच्या माजी दिवंगत सदस्यांना आज शोकप्रस्ताव मांडून श्रद्धांजली वाहण्यात आली. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिवंगत सदस्यांच्या कार्याचा उल्लेख करून समाज आणि देशाच्या विकासात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला.
भारतरत्न लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज, रामनिवास सिंह, एन.डी. पाटील, सुधीर जोशी, दत्तात्रय लंके, संजीवनी हरी रायकर, आशाताई टाले, कुमुद महादेव रांगणेकर यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी समाज आणि राष्ट्राच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव केला. शोक प्रस्तावानंतर सभागृहातील सर्व सदस्यांनी दिवंगत सदस्यांना उभे राहून श्रद्धांजली वाहिली.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/daySOzn
https://ift.tt/Zq3aDUh
No comments:
Post a Comment