मंत्रालयातील चित्रमय प्रदर्शनास महिला व बालविकास मंत्री – ॲड.यशोमती ठाकूर यांची भेट - latur saptrang

Breaking

Tuesday, March 15, 2022

मंत्रालयातील चित्रमय प्रदर्शनास महिला व बालविकास मंत्री – ॲड.यशोमती ठाकूर यांची भेट

मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात राज्य शासनाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त चित्रमय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनास महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी भेट दिली व महासंचालनालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) गणेश रामदासी व संचालक (वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे उपस्थित होते.

महिला व बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, ‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’या संकल्पनेवर आधारित सुंदर प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शासनाने कोविड काळात घेतलेले महत्त्वाचे निर्णय,योजना व उपक्रमांची माहिती  देणारे हे प्रदर्शन आहे. महिला आणि बालकांच्या विकासासाठी काम करत असताना कोरोनाचे संकट असतानाही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांची अंमलबजावणी महिला व बालविकास विभागाने केली आहे, असेही  ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

यावेळी ॲड.यशोमती ठाकूर यांनी प्रदर्शनातील ३६० डिग्री सेल्फी पॉईंट येथे भेट देऊन,  शासनाच्या प्रसिद्धीचे फलक घेऊन व्हिडीओ सेल्फीही घेतला.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/I0Rbxda
https://ift.tt/tV9mwsp

No comments:

Post a Comment