प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता अभियान सुरू केलेले आहे, त्या अभियानाअंतर्गत गावातील स्वच्छता उच्चशिक्षित लोकांनी करून दिली अशाच पद्धतीने गावातील स्वच्छता होणे गरजेचे होते.परंतु मुरूड ग्रामपंचायत आजपर्यंत कधीही अशी स्वच्छता केली नव्हती म्हणूनच नागरिकात अशी चर्चा होत आहे की ,महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती लोकप्रतिनिधी यापुढे लक्ष देतील का ? यापुढे स्वच्छता होईल का ? श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून गावातील स्वच्छता झालेली आहे त्यामध्ये बारा टन ओला कचरा तर सुका नऊ टन कचरा या एकत्रित करून ट्रॅक्टरने ग्रामपंचायतीच्या सुपूर्त केला आहे , तसेच अशाच प्रकारे स्वच्छता व्हावी व नागरिकांच्या आरोग्याची काळजी करावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment