कोरोनाचा आणखी एक नवीन व्हेरियंट, दोन रुग्ण पॉझिटिव्ह - latur saptrang

Breaking

Thursday, March 17, 2022

कोरोनाचा आणखी एक नवीन व्हेरियंट, दोन रुग्ण पॉझिटिव्ह

 



कोरोनाचा आणखी एक नवीन व्हेरियंट, दोन रुग्ण पॉझिटिव्ह


चीनमध्ये कोरोनाने (Corona) धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक शहरं लॉकडाऊन करण्यात आली आहे. त्यातच आता इस्त्रायलमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरियंट (Corona New Variant) आढळल्याची चिंताजनक बातमी समोर आली आहे. या देशात या नव्या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. याबाबत संबंधित देशाच्या आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, कोरोनाचा नवा व्हेरियंट हा ओमिक्रॉनचे BA.1 आणि BA.2 हे दोन सबव्हेरियंट मिळून तयार झाला आहे. इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर उतरलेल्या दोन प्रवाशांच्या आरटी पीसीआर अहवालात हा प्रकार आढळून आला आहे. पण, यामुळे चिंता करण्याची गरज नाही, असंही आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

लक्षणं काय? -

सध्या संपूर्ण जगात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबद्दल माहिती नाही. पण, या व्हेरियंटची लागण झालेल्या दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत. त्यांना ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे यांसारखी लक्षणे दिसून आली आहेत. तसेच त्यांना कुठल्याही विशेष उपचारांची गरज नाही. त्यामुळे आम्हाला फारशी चिंता करण्याची गरज नाही, असं इस्त्रायलचे पँडेमिक रिस्पांस चीफ सलमान जरका यांनी सांगितलं. तसेच आतापर्यंत इस्त्रायलच्या 9.2 दशलक्ष लोकसंख्येपैकी चार दशलक्षाहून अधिक लोकांना कोरोनाव्हायरस लसीचे प्रत्येकी तीन डोस मिळाले आहेत.

चीनमध्ये कोरोनाचा धुमाकूळ -

कोरोनाने चीनमध्ये पुन्हा धुमाकूळ घातला असून अनेक शहरं लॉकडाऊन करण्यात आली आहे. कोरेानामुळे १३ शहरात लॉकडाउन लागू केल्याने तब्बल ३ कोटी लोकांना घरात राहावे लागत आहे. याशिवाय अन्य काही शहरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना चाचणी केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी आणि फवारणी करण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जात आहे.

No comments:

Post a Comment