उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या दणदणीत विजयानंतर योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची पदाची शपथ घेतली. योगींसोबत ५२ मंत्र्यांनीही शपथ घेतली, त्यात दोन उपमुख्यमंत्री, १६ कॅबिनेट मंत्री, १४ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि २० राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. योगींच्या या मंत्रिमंडळातील आश्चर्यचकीत करणारे एकमेव मुस्लिम नाव म्हणजे दानिश आजाद अन्सारी.
योगींच्या मंत्रिमंडळातील एकमेव मुस्लिम असणारे दानिश हे मूळचे बलियातील बसंतपुरचे रहिवासी आहेत. मंत्रिमंडळात येण्यापूर्वी ते लखनऊ विद्यापीठाताल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (ABVP) संबंधित होते. योगींच्या यापूर्वीच्या मंत्रिमंडळात अल्पसंख्याक कल्याण राज्यमंत्री, मुस्लिम वक्फ आणि हजमंत्री मोहसिन रझा मुस्लिम मंत्री होते. पण आताच्या मंत्रिमंडळात दानिश आजाद अन्सारी हे एकमेव मुस्लिम मंत्री आहेत.
दानिश अन्सारी गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (ABVP) संबंधित आहेत. योगी सरकार आल्यावर त्यांना भाषा समितीचे सदस्य करण्यात आले होते. गेल्यावर्षी भाजपने त्यांना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी सोपवली. अल्पसंख्याक समाजात ते सातत्याने सक्रिय होते. याचीच पोहचपावती म्हणून, त्यांना योगी सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले. ते यूपी सरकारच्या फखरुद्दीन अली मेमोरियल कमिटीचे सदस्यदेखील आहेत. २०१७ पासून दानिश यांनी भाजप पक्षात आणि सध्या योगींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे.
दानिश यांनी सुरुवातीचे शिक्षण बलिया येथून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी लखनौ विद्यापीठातून मास्टर ऑफ क्वालिटी मॅनेजमेंट आणि मास्टर ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण घेतले. जानेवारी २०११ पासून ते अभाविप या विद्यार्थी चळवळीत सक्रिय होते. विद्यार्थीदशेपासूनच दानिश स्वतंत्र विचारांचे होते यातून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. चळवळीत ते मोकळेपणाने बोलत आणि लोकांना प्रभावित करत तेव्हापासून त्यांना लोक आजाद या नावाने ओळखू लागले.
दानिश यांची कौटुंबिक पार्श्वभूमी
दानिश हे एका मुस्लिम कुटुंबात जन्मले आहेत. दानिश अन्सारी हे त्यांच्या आई-वडिलांचे एकमेव पुत्र आहेत. दानिश विवाहित असून ते 32 वर्षांचे आहेत. उत्तर प्रदेशातील बलिया भागामध्ये त्यांच्या कुटुंबांची चांगली ओळख आहे. त्यांचे आई-वडील दोघेही अत्यंत धार्मिक आहेत ते नेहमी हजला जात असतात.
No comments:
Post a Comment