पोलीस ठाणे विवेकानंद चौक,लातूर ची कामगीरी चोरीच्या 19 मोटार सायकल चोरीसह 01 आरोपी अटक असुन असा एकुण 3,80,000/- रुपये चा मुद्देमाल - latur saptrang

Breaking

Saturday, April 2, 2022

पोलीस ठाणे विवेकानंद चौक,लातूर ची कामगीरी चोरीच्या 19 मोटार सायकल चोरीसह 01 आरोपी अटक असुन असा एकुण 3,80,000/- रुपये चा मुद्देमाल




 पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यातील घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याची विशेषतः मो.सा. चोरीच्या गुन्हे उघडकीस आणण्या करीता निर्देशीत केले होते त्या अनुषंगाने पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान पोलीस स्टेशन विवेकानंद चौक, लातूर येथे दिनांक 28/03/2022 रोजी फिर्यादी नामे अशोक ज्योतीराम निकम रा. पोखरी ता. अंबाजोगाई जि.बीड यांनी दिनांक 24/04/2022 रोजी यशवंतराव चव्हाण रुग्णालय, लातूर (एम.आय.टी. कॉलेज) येथे पार्किंगमध्ये लावलेली स्प्लेंडर प्लस मो.सा. क्रमांक एम. एम. 24-जे-2113 ही कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली वगैरे जबाबवरून पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर येथे गुरनं 189/2022 कलम 379 भादंवि प्रमाणे गुन्हा दिनांक 28/03/2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यातील गेला माल व अज्ञात आरोपीचा पोलीस पथक शोध घेत असताना

गुप्तबातमीदार मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यात चोरी गेलेली मो.सा. घेऊन एक इसम सिध्देश्वर मंदीराचे पाठीमागे फिरत आहे. असे माहिती मिळालेवरून आम्ही त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याचे नाव अखिल मेहबूब शेख वय-34 वर्षे रा. हबीबपुरा परळी ता.परळी जि.बीड ह.मु. शाम नगर, लातूर असे आहे. त्यांचेकडून सदर गुन्ह्यातील मो.सा. जप्त करण्यात आली आहे.
आरोपीकडे अधिक चौकशी केली असता तपासा दरम्यान निष्पन्न झाले की, आरोपीने प्रॉपर लातूर शहर, उदगीर, माळाकोळी, अंबेजोगाई, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, शिक्रापूर जि. पुणे इत्यादी ठिकाणाहून मो.सा.चोरी केलेल्या आहेत. आरोपीकडून आज पावेतो 18 मो.सा. जप्त करण्यात आलेल्या आहेत.
आरोपीस पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर गुरनं 189/2022 कलम 379 भादंवि मध्ये आज दिनांक 02/04/2022 रोजी अटक करण्यात आलेली आहे. या गुन्ह्यातील 01 मो.सा. व इतर 18 मो.सा. अशा एकुण 19 मो.सा. जप्त करण्यात आलेल्या आहेत.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू असून सदर आरोपीकडून इतर मो.सा. चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री निखील पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर श्री जितेंद्र जगदाळे, परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक श्री अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात असलेल्या पथकातील पोलीस अधिकारी सपोनि भाऊसाहेब खंदारे पोउपनि महेश गळगटे, पोउपनि जिलानी मानुल्ला, पोउपनि बालाजी गोणारकर सफो बुडेपाटील, मुन्ना पठाण, संजय कांबळे, रामलिंग शिंदे, दयानंद सारुळे, विनोद चलवाड, रमेश नामदास, अशोक नलवाड, नारायण शिंदे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment