आरपीआयचे कार्यकर्ते 3 मे रोजी मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करतील : रामदास आठवले - latur saptrang

Breaking

Saturday, April 23, 2022

आरपीआयचे कार्यकर्ते 3 मे रोजी मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करतील : रामदास आठवले



 Ramdas Athawale : मशिदींवरील भोंग्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापलं आहे. 3 मे पर्यंत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्याचा अल्टिमेटम मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला आहे. या वादात आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. 3 मे रोजी आरपीआयचे (RPI) कार्यकर्ते राज्यातील ठिककाणच्या मशिदींसमोर जाऊन मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करतील, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.  

रामदास आठवले यांनी आज राज ठाकरे यांच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, "अजानला विरोध करणे चुकिचे आहे. कारण अजान फक्त काही मिनिटांची असते. त्यामुळे त्याचा कोणाला त्रास होत नाही. भाजप राज ठाकरेंसोबत युती करणं अशक्य आहे. जोपर्यंत मी येथे आहे, तोपर्यंत राज ठाकरे येथे येऊ शकत नाहीत. राज ठाकरेंना सोबत घेणं भाजपला परवडणारे नाही."

"राज ठाकरे समाजात तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला परवानगी देऊ नये, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेत आम्ही भाजपसोबत युती करणार आहे. सत्ता आली तर आरपीआयला उपमहापौरपद मिळावे, अशी मागणीही रामदास आठवले यांनी यावेळी केली आहे. 

शरद पवारांमुळे जातियवाद वाढला नाही
राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून शरद पवार यांच्यामुळे जातियवाद वाढला असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, "शरद पवारांमुळे जातिवाद वाढला असं माझ मत नाही.  परंतु, त्यांच्या सोबतचे काही लोक जातिवादी आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबाबत गरळ ओकण्याचं काहीच कारण नाही."

"महाराष्ट्रात राष्ट्रपती राज्यवट लागू करावी अशी आमची मागणी पहिल्यापासून आहे. त्यामुळे आज राणा दाम्पत्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी योग्य आहे. परंतु, केंद्र सरकार तसे करणार नाही. याबरोबरच महाराष्ट्र पोलिसांनी सरकारच्या दबावात राहून काम करू नये, जे लोक राणा दाम्पत्याला घेराव घालत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment