लातूर शहरात नळाद्वारे येणारे पिवळसर पाणी पिण्यास योग्य ..... कार्यकारी अभियंता, मनपा लातूर - latur saptrang

Breaking

Friday, April 15, 2022

लातूर शहरात नळाद्वारे येणारे पिवळसर पाणी पिण्यास योग्य ..... कार्यकारी अभियंता, मनपा लातूर



 लातूर शहरात नळाद्वारे येणारे पिवळसर पाणी पिण्यास योग्य ..... कार्यकारी अभियंता, मनपा लातूर


 लातूर शहरातील जनतेला आवाहन करण्यांत येते की, लातूर शहर पाणी पुरवठा योजना मुख्य  स्त्रोत असलेले मांजरा धरण क्षेत्रामध्ये पावसाळ्यात, हिवाळ्यात पाण्यामध्ये  शेवाळाचे प्रमाण असल्याने व सध्यां वाढलेल्यां तापमानामुळे पाण्याची पातळी घटत जाते. विरघळलेले ऑक्सिजनचे प्रमाण पाण्या्त कमी होत जाते त्यांमुळे पाण्यामध्ये शेवाळ निर्मिती प्रक्रिया जलद गतीने होते. जसे शेवाळ वितरीत पाणी क्लोरीनच्या् सानिध्यात येते त्या‍मुळे कधी कधी पाण्याचा पिवळसर कलर येतो. सदरचे पाणी हरंगुळ जलशुध्दीकरण केंद्र येथे जलशुध्दी करण प्रक्रिये मध्ये जसे ब्लिचींग पावडर, तुरटी, क्लोेरीन गॅस व PAC पावडरचा वापर करुन पिवळसरपणा कमी करण्यात येत आहे. सदर पाण्याची जलकुंभनिहाय पाणी चाचणी घेतली असता सदरचे पाणी अनुजैविकदृष्याा पिण्यास योग्यच आहे. तसेच जलशुध्दीेकरण केंद्र येथील फिल्टर CFL स्वच्छतेचे काम सुरु आहे. अशी माहीती कार्यकारी अभियंता,मनपा,लातूर यानी दिली आह्रे.

--

No comments:

Post a Comment