केंद्र सरकारच्या दबावात येऊ नका, उपमुख्यमंत्र्यांनी भर सभेत पोलीस महासंचालकांना सुनावले - latur saptrang

Breaking

Saturday, April 30, 2022

केंद्र सरकारच्या दबावात येऊ नका, उपमुख्यमंत्र्यांनी भर सभेत पोलीस महासंचालकांना सुनावले

 


केंद्र सरकारच्या दबावात येऊ नका, उपमुख्यमंत्र्यांनी भर सभेत पोलीस महासंचालकांना सुनावले

Ajit Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक विषयांवर फटकेबाजी करताना मंचावर असलेल्या राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची चांगलीच शाळा घेतली आहे.


नागपूर पोलीस भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक विषयांवर फटकेबाजी करताना मंचावर असलेल्या राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची चांगलीच शाळा घेतली आहे. अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे का होईना पोलीस विरोधकांच्या दबावात काम करत असल्याचा आरोप करत पोलीस महासंचालकांना सुनावले. या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, रजनीश सेठ माझं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे, काम करत असताना हा कुठल्या तरी सत्ताधारी पक्षाचा व्यक्ती आहे. ती विरोधी पक्षाची व्यक्ती आहे. मात्र, केंद्रांमध्ये ते सत्तेवर आहेत, असे कुठलेही दबाव अधिकाऱ्यांनी आणू नये. काम निष्पक्ष पद्धतीने झाले पाहिजे. त्यामध्ये राजकीय दबाव असता कामा नये असे अजित पवार म्हणाले.

अजित दादा एवढ्यावरच थांबले नाही तर, मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून गृहमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो आहे की, पोलिसांवर राजकीय दबाव नसला पाहिजे. पोलिसांना पूर्णपणे योग्य पद्धतीने तपास करण्याची मुभा असली पाहिजे. नाहीतर तो माझा आहे, जरा दुर्लक्ष कर, आता तो सापडला आहे. तर त्याचा कामच कर.. हे असलं काही होता कामा नये, असे अजित पवार म्हणाले. लक्षात ठेवा शेवटी आपण सर्व बारा कोटी जनतेला जबाबदार आहोत. महाराष्ट्र पोलिसांची परंपरा फार वेगळी आहे. नाव लौकिक वेगळे आहे. देशातलं उत्कृष्ट पोलीस दल असा महाराष्ट्र पोलिसांचा नाव आहे आणि  महाराष्ट्र पोलिसांनी वेळोवेळी ते सिद्ध ही केले आहे. त्यामुळे अशा वेळेस आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता. कुठल्याही आमिषाला बळी न पडता. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता पारदर्शक पद्धतीने काम केले पाहिजे असे अजित पवार म्हणाले. 

रजनीश सेठ आणि दिलीप राव तुम्ही दोघे जेव्हा-केव्हा माझ्याकडे कुठले ही काम घेऊन येता. त्यावेळेस ताबडतोड तुमची प्रत्येक गोष्ट मंजूर करण्याचे काम आम्ही करतो. आमची ही अडचण असतेच मात्र पोलिसांचे काम केलेच पाहिजे असे आमचे धोरण आहे. त्यामुळे पोलिसानी ही कोणाच्या दबावात काम करू नये, असे अजित दादांनी थेट पोलीस महासंचालकांना सुनावले.



No comments:

Post a Comment