सुशिक्षित बेरोजगारांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन - latur saptrang

Breaking

Wednesday, April 13, 2022

सुशिक्षित बेरोजगारांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

 सुशिक्षित बेरोजगारांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम


 या योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन


 


            हिंगोली (जिमाका) दि.13: जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बेरोजगारांना उत्पादन उद्योग व सेवा उद्योगासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना गत तीन वर्षांपासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सेवा उद्योगासाठी रु.10 लाख च्या मर्यादेपर्यंत व उत्पादन उद्योगासाठी रु. 50 लक्ष पर्यंत बँकेमार्फत अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत या कार्यालयाकडून बँकेच्या कर्ज मंजूरीनंतर 15 टक्के ते 35 टक्के पर्यंत जार्त प्रवर्ग/ उद्योग कार्यक्षेत्रानुसार अनुदान देय आहे.


            जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारानी उद्योगासाठी ऑनलाईन अर्ज maha-cmegp.gov.in  या संकेतस्थळावर करावे. यासाठी आवश्यक कागदपत्रे - आधार कार्ड,फोटो, पॅनकार्ड, प्रकल्प अहवाल, जातीचे प्रमाणपत्र (राखीव प्रवर्गासाठी), टी.सी., अंडर टेकींग फॉर्म, लोकसंख्येचा दाखला (ग्रामीण भागासाठी) इत्यादी . अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली येथे संपर्क साधावा असे आवाहन  महाव्यवस्थापक,  जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली  यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment