विलास कारखान्याच्या वतीने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त वृक्षारोपन, क्रीडा साहित्याचे वाटप, रूग्णांना एकवेळ भोजनाची व्यवस्था आदी उपक्रमाचे आयोजन - latur saptrang

Breaking

Tuesday, April 19, 2022

विलास कारखान्याच्या वतीने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त वृक्षारोपन, क्रीडा साहित्याचे वाटप, रूग्णांना एकवेळ भोजनाची व्यवस्था आदी उपक्रमाचे आयोजन



 विलास कारखान्याच्या वतीने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख

यांच्या वाढदिवसानिमीत्त वृक्षारोपन, क्रीडा साहित्याचे वाटप, रूग्णांना

एकवेळ भोजनाची व्यवस्था आदी उपक्रमाचे आयोजन

 

लातूर प्रतिनिधी : १८ एप्रिल २०२२ :

   माजी मंत्री, सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विलास सहकारी साखर कारखाना लि. वैशालीनगर, निवळीच्या वतीने सर्व संचालकांच्या उपस्थितीत सोमवार दि. १८ एप्रिल २०२२ रोजी कारखाना स्थळी वृक्षारोपन, क्रीडा साहित्याचे वाटप, विलासराव देशमुख शासकीय रूग्णालय येथे रूग्णांना एकवेळचे भोजनाची व्यवस्था आदी उपक्रमाचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

  गावच्या सरपंच पदापासून राज्याचे मंत्री म्हणून काम करतांना माजी मंत्री, सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख यांनी उभारणी केलेले विविध क्षेत्रातील काम पाहता असे दिूसून येते की, त्यांची राजकीय, सार्वजनिक जीवनातली वाटचाल पायरी-पायरीने पुढे गेलेली एक नियोजनबद्ध प्रक्रिया आहे. एखादा पायथ्याला उभा असलेला डोळस माणूस नेहमी नियोजन करत असतो. शिखरावर गेल्यावर काय करायचे,अशी नियोजनबद्ध आखणी करून झालेली वाटचाल म्हणजे दिलीपराव देशमुख यांचा सार्वजनीक जीवनाचा प्रवास होय. विविध क्षेत्रातील कार्य थोडक्यात पाहिल तर आपल्या लक्षात येत पक्ष संघटना, सहकार, साखर उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्था, जलव्यवस्थापन, दुष्काळ, सिंचन क्षेत्र, शिक्षण, क्रीडा, पर्यावरण या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कामाची उभारणी केली आहे. एखादी संस्था कशी उभा करावी, तिचा कारभार कसा चालवावा, ती संस्था सर्वाच्या सहकार्यातून कशी वाढवावी या संस्थापक कामाची उभारणीसाठी आदरणीय दिलीपराव देशमुख हे निश्चीतच प्रेरणादायी आहेत. त्याचा वाढदिवस विविध उपक्रमाचे आयोजन करून विलास कारखाना स्थळी साजरा करण्यात आला.

   माजी मंत्री, सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोमवार दि. १८ एप्रिल २०२२ रोजी कारखाना स्थळी सकाळी सर्व संचालकांच्या उपस्थितीत पर्यावरण संवर्धन व सुशोभिकरणासाठी वृक्षाचे वृक्षारोपन करण्यात आले. यानंतर विलास कारखाना कार्यक्षेत्रातील मुरूड अकोला, चिखुर्डा, आखरवाई, मुरूड, चिंचोली ब., गातेगाव येथील खेळाडूना क्रीक्रेट व व्हॉलीबॉलचे साहित्य भेट देण्यात आले आहे. तसेच विलासराव देशमुख शासकीय रूग्णालय येथे रूग्णांना एकवेळचे भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

  यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरूनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अनिल पाटील, रंजीत पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, शेतकी अधिकारी कल्याणकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment