मुरुड येथे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आरोग्य मेळावा, रक्तदान शिबिराचे आयोजन
नागरिकांनी या आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा-डॉ. सुनीता पाटील
मुरुड प्रतिनिधी :- ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे सोमवार दि. 18 एप्रिल रोजी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आरोग्य मेळावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे.
यामध्ये सर्वप्रकारचे तज्ञ डॉ. (भिषक, शल्यचिकीत्सक, स्त्री रोग, बालरोग, अस्थीरोग, नेत्र, कान नाक घसा इत्यादी) उपस्थित राहणार आहेत.
सर्व प्रकारच्या आजारांचे निदान व औषधोपचार केले जातील.तसेच रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले असून सर्व प्रकारच्या आरोग्य योजनांची माहिती दिली जाणार आहे.
या मेळाव्याचा रुग्णांनी लाभ घ्यावा ,मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात येणार आहे .
या आरोग्य मेळाव्याचे उद्दीष्टे, विविध आरोग्य कार्यक्रमाबद्दल जागृकता निर्माण करणे, एबीडीएम अंतर्गत युनिक हेल्थ आयडी तयार करणे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड मिळवून देण्यासाठी मदत करणे, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण देणे, निरोगी राहण्यासाठी अनुरूप जीवनमान स्वीकारण्यासाठी प्रेरित करणे, विविध आजारासाठी स्क्रीनिंग, औषध उपचार व संदर्भ सेवा प्रदान करणे, भिषक शल्यचिकित्सक, बाल रोग तज्ञ, काननाकघसा तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, दंत चिकित्सक, बधिरीकरण तज्ञ, नेत्र तज्ञ व अयुष तज्ञ इत्यादी सेवा उपलब्ध करून देणे, रक्तदान शिबीर आयोजित करणे, मोतीबिंदू पात्र रूग्ण शोधणे व अवयवदान नोंदणी करणे हे सर्व उद्दिष्ट आजादी का अमृत महोत्सव निमित्त आयोजित मेळाव्यात पूर्ण होणार आहेत. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा.असे आवाहन मुरुड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ सुनीता पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment