मुंबई शहर जिल्ह्यातील अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवाहन - latur saptrang

Breaking

Tuesday, April 26, 2022

मुंबई शहर जिल्ह्यातील अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवाहन

मुंबई, दि. 26 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र या प्रवर्गातील विर्थ्यांकरिता राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजना शैक्षणिक वर्ष सन 2021-22 मधील अर्ज ऑनलाईन सादर करण्याकरिता महाडिबीटी  पोर्टल (https://mahadbtmahait.gov.in) दि. 14 डिसेंबर 2021 पासून सुरु करण्यात आले आहे.  या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि.30 एप्रिल असणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या स्वीकृती (New/Renewal) ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तसेच शैक्षणिक वर्ष 2020-21 (Re-apply) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल, 2022 अशी आहे.

तर शैक्षणिक वर्ष 2021-22 भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेकरिता (Renewal) ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल, 2022 अशी आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी, सर्व प्राचार्य, कर्मचारी यांना शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक व तत्काळ भरावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी केले आहे.

००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/C5i4XEd
https://ift.tt/7lRHJu3

No comments:

Post a Comment