प्रेम प्रकरणात बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न - latur saptrang

Breaking

Saturday, April 16, 2022

प्रेम प्रकरणात बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न

 लातूर- सदर घटनेला आज 9  दिवस होत आहे. दिनांक 13 एप्रिल रोजी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना रीतसर तक्रार निवेदन दिले आहे पण आत्तापर्यंत माझ्या मुलाचा जबाब घेण्यासाठी कोणताही पोलीस आलेला नाही. माझ्या मुलाची प्रकृती बिघडत चालले आहे, त्याचे काय होईल काहीही सांगता येत नाही. पोलिसांनी अर्जुन सूर्यवंशी यांच्या जबाबावरून फिर्याद घेतली आहे पण यात अनेकांची नावे का आले नाहीत याचा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर जवाब नोंदवावा जेणेकरून खरे गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई होईल असे आम्हाला वाटत आहे, अशी फिर्याद कलुबाई नरसिंग माने राहणार हेर तालुका उदगीर जिल्हा लातूर यांनी दिल्याचे या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.



     पुढे बोलताना कलुबाई माने म्हणाल्या की माझा मुलगा विजय नरसिंग माने यास पूजा सूर्यवंशीने फोन करून सात एप्रिल रोजी मध्यरात्री नागेवाडी तालुका शिरूर अनंतपाळ येथे घरी येण्यास सांगितले मग विजय व त्याचा मित्र अर्जुन सूर्यवंशी व अभंग घोलप सर्वजण राहणार नागेवाडी पुज्याच्या घरी गेले पण अर्जुन व अभंग बाहेरच थांबला होता.विजय घरात येताच सात ते आठ लोक घरात थांबले होते व विजयला आलेला आहे बघून मारहाण करण्यास सुरुवात केली. यात नामदेव नागोराव सूर्यवंशी राहणार नागेवाडी यांनी पोटात चाकूने सपासप वार केले व विजयाचा डोळा फोडला, माधव नामदेव सूर्यवंशी यांनी लोखंडी रॉडने डोक्यात वार केले. सत्यकला नामदेव सूर्यवंशी मुलीची आई हिने विजेचे दोन्ही पाय घट्ट धरले होते व मुलगा धीरज नामदेव सूर्यवंशी याने गुडघ्याची वाटी फोडली आणि चाकूने मांडीवर  सपासप वार केले. त्यांची मुलगी शीतल सुरवंशी हिने विजेचे दोन्ही हात घट्ट धरले होते,नागेश वेंकट लांडगे राहणार कानेगाव व वैजनाथ सिताराम सोनकांबळे पूजेचा पती यांनी मिळून कोयत्याने पाठीत वार केले.या सर्वांच्या मारहाणीत विजयचा डोळा गेला, गुडघ्याची वाटी फुटली, डोक्यात जबर मार लागला. मानेवर कोयत्याने वार केले.पोटातील आतडे बाहेर आले होते.यादरम्यान तो रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध अवस्थेत पडला तिथे असलेले सिताराम तुळशीराम सोनकांबळे व त्यांची पत्नी केवळबाई सोनकांबळे यांनी विजयला घराबाहेर बेशुद्ध अवस्थेत काढले व अंगणात टाकले हा सर्व थरार मध्यरात्री चालू होता अर्जुन जनार्दन सूर्यवंशी हा थरार पहात होता. या  घटनेबाबत नागेवाडीचे सरपंच यांना माहिती दिली यांनी घटनास्थळी धाव घेऊन 108 नंबर ला फोन करून रक्तबंबाळ व बेशुद्ध अवस्थेत असलेला विजयला शिरूर अनंतपाळ येथील शासकीय दवाखान्यात पाठविले.तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी लातूर येथे शासकीय दवाखान्यात पहाटे 3 च्या सुमारास पाठविले गेले, असेही या निवेदनात नमूद केले आहे.

     सदरील सर्व घटनेची माहिती पोलिसांना समजल्यावर विजय माने सोबत आलेला अर्जुन सूर्यवंशी याला दिनांक 8 एप्रिल रोजी म्हणजे दुसऱ्या दिवशी पोलिसांनी फिर्यादीवरून जवाब घेतला.पोलिसाकडे मी व माझा मुलगा गेला असता पोलिसांनी आम्हाला दमदाटी करत बाहेर काढले आमचे म्हणणे सुद्धा ऐकून घेतले नाही उलट आम्हाला असे सांगितले की तुम्हाला कुठे जायचे आहे तेथे जावा.पोलिसांनी योग्यरीत्या चौकशी केली नाही अनेकांना या प्रकरणात वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.पोलीस अधीक्षक  आपण स्वतः या प्रकरणात जातीने लक्ष घालून याची चौकशी करून वरील सर्व लोकांवर कायदेशीर मार्गाने कारवाई करावी व आम्हाला न्याय द्यावा,अशी विनंती या निवेदनामध्ये कलुबाई नरसिंग माने  यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment