कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ आज दसरा चौक येथे आयोजित केलेल्या 'युवा मेळाव्या'ला कोल्हापुरातील युवक-युवतींचा मिळालेला प्रतिसादच जयश्रीताईंच्या विजयाची नांदी आहे.
आमदार प्रणिती शिंदेजी, आमदार धीरज देशमुखजी, आमदार रोहित पवारजी, युवासेना सचिव वरुण सरदेसाईजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोल्हापुरातील युवक-युवतींच्या प्रचंड उत्साहामध्ये हा मेळावा संपन्न झाला.
स्व. चंद्रकांत आण्णा यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागू नये अशी सर्व कोल्हापूरवासीयांची इच्छा होती. यासाठी पालकमंत्री सतेज पाटील साहेबांनी विरोधकांना भेटून विनंती केली. मात्र, कोल्हापूरचा राजकीय इतिहास आणि संस्कृतीला तडा देण्याचे काम भाजपने केले आहे. सत्तेच्या लालसेपोटी निवडणूककेंद्रित विचारसरणी बाळगून विरोधकांनी ही पोटनिवडणूक स्वाभिमानी कोल्हापूरकरांवर लादलेली आहे.
छत्रपती ताराराणींचा इतिहास सांगणारी ही पुण्यभूमी असून या भूमीतून पहिली महिला आमदार म्हणून आपल्याला जयश्री वहिनींना विधानसभेत पाठवायचे आहे. त्यांच्या निवडीने इतिहास रचला जाणार आहे. आणि इतिहास घडविण्याचे काम आपले तरुण करतील, असा विश्वास आहे.
तरूणांच्या हाताला काम देण्यासाठी 'मिशन रोजगार' सारखे अनेक प्रकारचे उपक्रम महाविकास आघाडी सरकारमार्फत आपण जिल्ह्यात राबवित आहोत. देशाला सक्षम बनविण्यासाठी युवकांना पुढे घेऊन जाणार जाण्याची भूमिका आमची राहिली आहे. पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन धोरण, कौशल्य विकास या मुद्दासह जिल्ह्यात सध्या ४०० स्टार्टअप सुरू असून अशा विविध माध्यमातून तरूणांच्या हाताला रोजगार दिला जातोय. मविआ'च्या माध्यमातून विकासाच्या वाटेवर जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.पूर आणि कोरोनाच्या संकटात आण्णांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करण्याचे काम केले, हे आपण सगळे कोल्हापूरकर जाणतात.
चंद्रकांत आण्णा हे फुटबॉलपटू होते. त्यांनी कोल्हापूरची क्रीडा संस्कृती जोपासली. राजकारणात खिलाडूवृत्ती जपत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची कामे केली. आण्णांचा राजकीय वारसा जपण्यासाठी आणि त्यांचे विकासाचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयश्री ताई ही निवडणूक लढवत आहेत. येत्या १२ तारखेला त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करून विकासाचा गोल मारणार, अशी मला खात्री आहे.
- आ. ऋतुराज पाटील
No comments:
Post a Comment