शरद पवारांच्या घरावरील आंदोलन प्रकरणी लातूर येथील तीन जणांना अटक
मुंबई पोलिसांनी शरद पवार यांच्या घरावर केलेल्या आंदोलनामध्ये ज्या 109 आंदोलकांना अटक केली आहे.
अभिषेक पाटील हा लातूर येथील एस टी कर्मचारी कालच्या आंदोलनमध्ये सहभागी होता पोलिसांनी त्यास अटक केली. लातूर येथील औसा रोड भागात तो राहतो.अभिषेक पाटील यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. वृद्ध आई घरी असते. पत्नी आणि मुले बरोबर राहत नाहीत. मागील काही वर्षांपासून वेगळे राहत आहेत अभिषेक पाटील आक्रमक आंदोलन करतात. ते लातूर डेपोमध्ये वाहतूक नियंत्रक पदावर काम करत होते मात्र संप काळातील आंदोलन मुळे बडतर्फ करण्यात आले आहे. अभिषेक पाटील कोणत्याही संघटनेत कधीच सक्रिय नव्हते मात्र संप काळात ते आक्रमक झाले आहेत. याच कारणामुळे संप काळात त्याच्यावर लातूर येथे तीन गुन्हे दाखल आहेत
दीपक जगदाळे हा कर्मचारी लातूर जिल्ह्यातील चापोलीचा रहिवासी आहे. दीपक जगदाळे लातूर डेपो मध्ये वाहक पदावर कार्यरत होते. संप काळातील आक्रमक भूमिकेमुळे बडतर्फ करण्यात आले आहे. भाई जगताप यांच्या इंटकमध्ये कार्यरत होते. मात्र संप काळातील भूमिकेमुळे संघटनेतून बाहेर करण्यात आले आहे. अशोक जावके हे औसा डेपो मध्ये लिपिक आहेत हे ही काल आंदोलनात होते यांना ही अटक झाली आहे. संप काळातील आक्रमक भूमिकेमुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे
No comments:
Post a Comment