बांधकाम व्यावसायिकांनी सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे निर्माण करावी- पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक,दि.२ एप्रिल :- नाशिकचे उद्योजक अतिशय सुंदर इमारती उभ्या करत आहेत. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशी घरे बांधावी असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. त्यांच्या हस्ते शहरातील विविध गृह प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, अनंत राजेगावकर, विजय सानप, अनिल आहेर, दिपक पवार, समाधान जेजुरकर, गोरख बोडके, बाळासाहेब गाढवे, किरण कातोरे, किशोर शिरसाठ, डॉ.एच.वाय. बांगर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज शहीद सर्कल, गंगापूर रोड, नाशिक येथे इलाईट डिझाईन इन्स्टिट्यूट शैक्षणिक संस्थेच्या नवीन वास्तू उद्घाटन, माणिक नगर, गंगापूर रोड येथे सौजन्य या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन, मोतीवाला कॉलेज जवळ, गंगापूर रोड येथे साई संस्कृती या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन तर अश्विन नगर सिडको येथे स्पर्श वूमन्स हॉस्पिटल उद्घाटन करण्यात आले.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक शहराचे हवामान अतिशय चांगले असून नाशिकडे येणाऱ्यांचा ओढा अधिक आहे. नाशिकमध्ये नागरिकांची पसंती असून अनेक नागरिकांनी याठिकाणी घरं घेतली आहे. याठिकाणी असलेले बांधकाम व्यावसायिक अतिशय सुंदर आणि पर्यावरण पूरक घरे बांधत आहे. इतर शहरांच्या तुलनेत अतिशय सुंदर इमारती नाशिक शहरात उभ्या राहत आहे. व्यावसायिकांनी घरे विकसित करतांना येथील सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशी घरे बांधण्यास प्राधान्य द्यावे. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल असे त्यांनी यावेळी संगितले. तसेच सर्वांना नवंवर्ष व गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment