छेडोगे तो छोडेंगे नही'; भोंगे हटवण्यावरून PIF संघटनेचा मनसेला इशारा - latur saptrang

Breaking

Saturday, April 16, 2022

छेडोगे तो छोडेंगे नही'; भोंगे हटवण्यावरून PIF संघटनेचा मनसेला इशारा

 


छेडोगे तो छोडेंगे नही'; भोंगे हटवण्यावरून PIF संघटनेचा मनसेला इशारा

सध्या हनुमान चालीसा आणि मशिदींवरील भोंगे या दोन मुद्द्यांवर राज्यातील वातापृवरण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मुंबईतील मशिदींतील भोंगे हटवण्याच्या अल्टिमेटमला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेने प्रत्युत्तर दिले आहे.
ठाण्यातील मुंब्रा येथे शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर पीएफआयचे मुंब्रा अध्यक्ष मतीन शेखानी यांनी मध्य प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या जातीय हिंसाचाराचा निषेध केला. मतीन म्हणाले, 'देशात मुस्लिमांवर अत्याचार होत असून काही लोकांना मुंब्य्रातील वातावरणही बिघडवायचे आहे. आमचा नारा आहे- छेडोगे तो छोडेंगे नही. महाराष्ट्रातील लाऊडस्पीकरवरील अजानबाबत ते म्हणाले की, 'एका लाऊडस्पीकरला हात लावलात तर पीएफआय आघाडीवर दिसेल.' आंदोलन संपल्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय अशोक नारायण कडलक यांना निवेदनही देण्यात आले.

No comments:

Post a Comment