मुरुडच्या मुरलीधर नागटिळकांची आधुनिक शेती अन्
सन 2017 शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर
लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील शेतकरी वय 72 वर्षे मुरलीधर गोविंदराव नागटिळक यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीच्या उत्पन्नात वाढ करुन शेतीच्या उत्पन्नात वाढ कशी करता येईल आणि त्यातून शेती विकासाला चालना देणे शक्य झाले आहे. मुरलीधर गोविंदराव नागटिळक यांना सन 2017 चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र दिनानिमित्त आज नाशिक येथे हा सोहळा पार पडणार आहे.
श्री.नागटिळक हे आधुनिक पध्दतीने शेती….
श्री. मुरलीधर नागटिळक यांनी सिताफळ लागवड- 0.80 आर एनएमके गोल्ड, मोसंबी- 0.20 आर. असून सिंचन सुविधा बोअर व शेततळे असल्यामुळे या क्षेत्रात भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा अवलंब करुन टोमॅटोचे उत्पादन घेवून उत्पन्न घेतले जाते.
उत्पादीत मालाची विक्री जिल्ह्यामध्ये केली जाते. टोमॅटोला लागवड मल्चींग व ठिबकवर केलेली आहे. सिताफळ, मोसंबी, आंबा, चिंच, चिक्कु पुर्णत ठिबक वर केलेले आहे. शेतीच्या बांधावर मिलीया डुबीया चे 400 झाडे लागवड केलेली आहे. एक एकर क्षेत्रावर शेडनेट उभारणी केलेली असुन त्यामध्ये भाजीपाला घेतला जात आहे.
26 जानेवारी 2020 ला लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते सत्कार झालेला आहे. शेतीतून वर्षकाठी उत्पादन खर्च वजा जाता रुपये 12 लाखापर्यंत नफा मिळवतात.
अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीच्या उत्पन्नात वाढ करता येते. त्यामुळे अशा संसाधनाचा जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी वापर करावा व कृषि विभागामार्फत शेतीबाबतचे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सल्ल्यांचा अवलंब करावा. आधुनिक पध्दतीने शेती करतात.
No comments:
Post a Comment