केंद्रानंतर राज्याचा मोठा निर्णय! पेट्रोल 2.8 तर डिझेल 1.44 रूपयांनी स्वस्त
सर्वांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे, महाराष्ट्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत, पेट्रोल दरांमध्ये प्रतिलिटर 2 रुपये 8 पैशांनी स्वस्त मिळेल तर डिझेल 1 रूपया 44 पैसे प्रतिलिटर स्वस्त होणार आहे. केंद्राकडून काल अबकारी करामध्ये कपात करण्यात आली होती त्यानंतर राज्य सरकारने देखील हा निर्णय घेतला आहे. शनिवारी केंद्र सरकराने पेट्रोलच्या दरात 8 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 6 रुपयांनी कपात केली आहे. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राज्य सरकारांना करात कपात करण्याची विनंती केली होती.
केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारांवर याबाबत दबाव वाढला होता दरम्यान केरळ सरकारने देखील सामान्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकारने सामान्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेताला आहे.
व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतल्याने सरकारवर वार्षिक अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे. दरम्यान काल केंद्र सरकारने आणि आज महाराष्ट्र सरकारने कमी केलेल्या करामुळे पेट्रोल 11 रुपये 58 पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेलचा दर 8 रुपये 44 पैशांनी कमी झाला आहे. व्हॅट कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर दराने मिळेल. डिझेल प्रति लिटर 95 रुपये 84 पैसे मिळणार आहे.
No comments:
Post a Comment