दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
🚫 आता साखरेच्या निर्यातीवर बंदी...! :
दिवसेंदिवस महागाईत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे खाद्यतेलानंतर आता साखरही स्वस्त होणार आहे. देशात यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झालं आहे. त्यामुळे देशांतर्गत साखरेचे दर वाढत होते. त्यामुळे वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे साखर स्वस्त होणार आहे.
😎 म्हाडा सरळसेवा भरतीबाबत महत्वाची बातमी :
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे सरळ सेवा भरती-2021 अंतर्गत आयोजित ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीकरिता संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. पहिल्या टप्प्याअंतर्गत कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 6 व 7 जून 2022 या दोन दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे. भरती प्रक्रियेअंतर्गत उर्वरित संवर्गातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी टप्प्याटप्प्याने बोलावण्यात येणार आहे.
📍 मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी :
मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं आता विना हेल्मेट दुचाकीस्वारांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत विनाहेल्मेट दुचाकी चालवण्याचं प्रमाण वाढल्यामुळे आता दुचाकी चालकासह पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक करण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. दुचाकीस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीनं हेल्मेट परिधान केलेलं नसेल तर कारवाई केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा -
✋ कपिल सिब्बल यांनी सोडला काँग्रेसचा हात :
काँग्रेस आणि पक्षातील जी-23 या नेत्यांच्या समुहातील प्रमुख नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पक्षाला राम राम केला आहे. कपिल सिब्बल समाजवादी पक्षात प्रवेश करणार असून त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कपिल सिब्बल काँग्रेसमधून बाहेर पडल्याने जी-23 गटातून एक नेता पक्षाबाहेर पडला आहे. कपिल सिबल यांनी 16 मे रोजीच आपला राजीनामा काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवला असल्याची माहिती दिली.
🏏 आज लखनऊ-बंगळुरू सामना; विजेत्यासमोर राजस्थानचे आव्हान
कर्णधार लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्स संघ आता आयपीएलच्या फायनलचा पल्ला गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी लखनऊ संघाची नजर एलिमिनेटर सामन्यातील विजयाकडे लागली आहे. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर आज बुधवारी लखनऊ आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरू संघात एलिमिनेटरचा सामना रंगणार आहे.
No comments:
Post a Comment