महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन - latur saptrang

Breaking

Sunday, May 1, 2022

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, दि. १ : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत  प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ,पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहुन अभिवादन केले.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम काटेकोरपणे पाळून महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्याही शुभेच्छा दिल्या. यावेळी राजशिष्टाचार विभाग,महानगर पालिका,पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/e9DSfyv
https://ift.tt/ebWwSgL

No comments:

Post a Comment