शिवसंपर्क अभियानास जामनेर मधुन उत्स्फूर्त प्रतिसाद
यूसुफ पठान
काल दि.२५/०५/२०२२(बुधवार) रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्ववजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना पक्ष निरीक्षक आबासाहेब पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर विधानसभा मतदारसंघात शिवसंपर्क अभियानास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
त्रिविक्रम भगवानाच्या आशिर्वाद घेऊन शेंदुर्णी शहरातून या अभियानास सुरुवात होऊन तालुक्यातील वाघारी,मोयखेडा दिगर,देवळसगाव,बेटावद बु. आणि रांजणी या गावात संपन्न झाले. कुठे फटाक्यांची आतिषबाजी,तर कुठे ढोलताशांचा नाद,तर कुठे घोषणांच्या जयजयकाराने जामनेर मतदारसंघात भगवा झंझावात आणि शिवसैनिकांत उत्साहाची लाट दिसून आली.
शिवसेना पक्षाचा विचार घराघरापर्यंत पोहचवण्यासाठी शिवसैनिकांना मेहनत घ्यावी लागेल.वैयक्तिक कामे करून शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवुन शिवसेनेचे कार्य तळागळात पोहचवा असे आदेश निरीक्षक आबासाहेब पतंगे यांनी दिले. शिवसेना शाखा प्रमुखांशी चर्चा करून पदाधिकाऱ्यांच्या कार्याची चाचपणी केली.
यावेळी युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी विश्वजितराजे मनोहर पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील, तालुका संघटक विष्णुभाऊ सोनवणे, तालुका प्रसिध्दी प्रमुख गणेश पांढरे, तालुका युवा अधिकारी विशाल लामखेडे,शिवसेना शेंदुर्णी शहर प्रमुख भैय्या गुजर,शिवसेना वैद्यकीय कक्ष तालुका समन्वयक प्रा.ईश्वर चोरडिया, माजी युवा उपजिल्हा युवा अधिकारी ॲड.भरत पवार,तालुका कार्यकारिणी युवा सदस्य मयुर पाटील,वाघारी-बेटावद जि.प.गट संघटक सुमित चव्हाण, तालुका युवा प्रसिद्धी प्रमुख मुकेश जाधव यांच्यासह सरपंच, उपसरपंच,ग्रा.पं.सदस्या,शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
No comments:
Post a Comment