मुंबई, दि. १७ : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे या योजनेकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणारे गाव/पाडे येथील इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, बोरीवली मुंबई या कार्यालयात दि.१ जून २०२२ पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांनी केले आहे.
या योजनेकरिता महाविद्यालय, विद्यापीठ प्रवेश, अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय प्रवेशाच्या माहिती पत्रकामध्ये तसेच इतर महाविद्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या पदवी व पदव्युत्तर असणाऱ्या इच्छुक अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींनी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृती देणे या योजनेकरिता विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, बोरीवली, मुंबई या कार्यालयास दि.१ जून २०२२ पर्यंत अर्ज सादर करावा,असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000
नवनविन बातम्या व माहितीसाठी आजच लिंक करा !
https://chat.whatsapp.com/JHlG6yiE7GjIe8TfpzZEpj
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/cozrHu7
https://ift.tt/0RfLM2b
No comments:
Post a Comment