ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत कार्यवाही करण्याच्या जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सूचना - latur saptrang

Breaking

Wednesday, May 18, 2022

ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत कार्यवाही करण्याच्या जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सूचना

मुंबई, दि. 18 : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिल्या.

घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. सारंगपूरी, खैरे, साठगांव, शिलोत्तर, शिवनेरी, धसई येथील डावातीर कालवा प्रकल्पांवरही चर्चा करण्यात आली.

भातसा धरणाच्या पाणी वापराचे फेर जलनियोजन करून या कालव्यांसाठी आवश्यक पाण्याची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहापूर तालुक्यातील मुंमरी प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना ठाणे जिल्हाधिकारी यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, सचिव प्रकल्प समन्वय विलास राजपूत व संबंधित अधिकारी उपस्थित होते.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/yPgeoZM
https://ift.tt/lZbTLED

No comments:

Post a Comment