दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी - latur saptrang

Breaking

Thursday, May 12, 2022

दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी





 🌧️ यंदा मान्सून वेळेआधी दाखल होणार - हवामान विभाग :


यंदा मान्सून वेळेआधीच येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दरवर्षी अंदमानमध्ये पाऊस 22 मेपर्यंत दाखल होत असतो. मात्र, यंदा पाऊस 13 ते 19 मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी दाखल होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. त्यानंतर 20 ते 26 मेपर्यंत पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर तळकोकणात 27 मे ते 2 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.


💁‍♂️ आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात संभाजीराजेंचा मोठा निर्णय! :

 

अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवणार आणि स्वराज्य नावाची संघटना स्थापन करणार असल्याच्या दोन मोठ्या घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी आज केल्या. खासदारकीची मुदत संपल्यानंतर आज गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका जाहीर केल्याने विविध चर्चांना पुर्णविराम लागला आहे.


🗣️ 'महाराष्ट्रात कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही' :


राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असे बाळा नांदगावकरांनी सांगितले होते. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सुरक्षित आहे, इथे कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही, आणि जर लागत असेल तर ठाकरे सरकारकडून सुरक्षा दिली जाईल, महाराष्ट्रातील नेत्याला हात लावायची कुणाची हिंमत नाही, शिवसेना भवनात असे धमकीचे पत्र रोज येतात, त्यामुळे ही स्टंटबाजी सोडून द्या, असं राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 


📍 वर्षात 20 लाखांच्या व्यवहारासाठी पॅन व आधारकार्ड बंधनकारक :


बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पैशांच्या व्यवहाराबाबत केंद्र सरकारने काही नवे नियम केले आहेत. नवीन नियमांनुसार, एका आर्थिक वर्षांत बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये 20 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख जमा केल्यास किंवा काढल्यास पॅन आणि आधार क्रमांक देणे खातेधारकांना आवश्यक करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे बॅंका, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी संस्थांना एका आर्थिक वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा अधिकचा व्यवहार असलेल्या खात्यांची माहिती देणे अनिवार्य झाले असून, यामुळे आधिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता येणार आहे.


🏏 आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज सामना रंगणार : 


इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आमनेसामने येणार आहेत. चेन्नईला बाद फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे. मुंबईला यंदाच्या हंगामात मात्र अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. चेन्नईला 11 पैकी चारच सामने जिंकता आले आहेत. आता आगेकूच करण्यासाठी त्यांनी उर्वरित सर्व सामने जिंकणे आणि अन्य निकाल त्यांच्या बाजूने लागणे आवश्यक आहे.


No comments:

Post a Comment