📌 दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 https://www.latursaptrangnew.com
😎 लालमहालातील 'लावणी' पडली महागात! :
पुण्याच्या लाल महालात लावणी सादर केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री वैष्णवी पाटील, मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. संभाजी ब्रिगेड संघटनेने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🚨 नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ :
मंत्री नबाव मलिक यांचे डी-गँगशी संबंध होते त्यांनी मनी लाँड्रिंग केल्याचे निरीक्षण कोर्टाचे नोंदवले आहे. ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर कोर्टाने हे निरिक्षण नोंदवलेले आहे. नवाब मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खानच्या संपर्कात होते, असे देखील सांगण्यात येत आहे. डी-गँगशी संबंध ठेवूनच गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली. असे कोर्टाचे म्हणणे आहे.
💫 मनसेच्या पुण्यातील सभेचा दुसरा टीझर जारी :
राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत, उद्या पुण्यात मनसेची जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरेंच्या पुण्यातल्या सभेसंदर्भातला दुसरा टीझर जारी करण्यात आला आहे. यात गुढी पाडवा मेळाव्या, ठाण्यातील उत्तर सभा, औरंगाबादेतील सभेचा राज ठाकरे यांच्या भाषणाचा काही भाग आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच राज यांनी पुण्यात हनुमान चालिसाचे पठण केले होते, त्याची देखील क्लिप टीझरमध्ये टाकण्यात आली आहे.
💁♂️ दिल्ली, पंजाबनंतर आता मुंबई जिंकण्यासाठी 'आप' सज्ज :
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं शहर म्हणजे मुंबई. या शहरात आगामी काळात महापालिकेची निवडणूक आहे. महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षाला आपली ताकद पणाला लावतो. त्यात शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेयांच्यात संघर्ष सुरू असताना मुंबईकरांना नवा पर्याय देण्याच्या जोरदार हालचाली आम आदमी पक्षानं सुरू केल्या आहेत. दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता काबिज केल्यानंतर मुंबईत पक्षाचा विस्तार करून मुंबई महापालिका जिंकण्यासाठी 'आप'नं डाव आखला आहे.
💥 बिहारमध्ये वीज पडून 33 जणांचा मृत्यू :
बिहारमधील 16 जिल्ह्यांमध्ये वीज पडून 33 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. देव मृतांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असे ट्विट पंतप्रधानांनी केलं आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
No comments:
Post a Comment