दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
🏦 उद्यापासून तीन दिवस बँका राहणार बंद :
बँकांची कामं आजच उरकून घ्या, कारण पुढचे तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. 14 मे ते 16 मे या काळात बँका बंद राहतील. शनिवार रविवार आणि बुद्धपौर्णिमेला सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आजच बँकेच्या शाखेत जाऊन बँकांची कामं करून घ्या, नाहीतर कामं संपण्यासाठी थेट मंगळवारची वाट पाहावी लागेल.
🌞 भारतात पुढील 5 दिवस तीव्र उष्णता राहील :
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पुढील 5 दिवस तीव्र उष्णता राहील. उत्तर-मध्य भारतात सरासरी कमाल तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. यूपी, बिहार, झारखंड, छत्तीसगडमध्ये तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. तर ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यात आसनी चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेट वेदरनुसार, आज गुजरात आणि राजस्थान, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण हरियाणाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
⚖️ महाराष्ट्रातील निवडणुका नेमक्या कधी? 17 मे रोजी फैसला! :
महाराष्ट्रातल्या निवडणुका नेमक्या कधी होणार? याचा फैसला आता सुप्रीम कोर्टात 17 मे रोजी होणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने आज आपली याचिका सुप्रीम कोर्टात मेन्शन केली. कोर्टाने त्यावर सुनावणीसाठी 17 मे दुपारी दोन वाजताची वेळ निश्चित केली आहे. महापालिका नगरपंचायती सप्टेंबरमध्ये तर जिल्हा परिषद ग्रामपंचायती ऑक्टोबरमध्ये घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
👀 नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा :
मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून एक दिलासा मिळाला आहे. मलिक गेले चार महिने तुरुंगात आहेत. मलिक यांना घरचे जेवण आणि खाजगी रुग्णालयात उपचार करून घेण्यास न्यायालयाने नकार दिला होता. मलिक यांची प्रकृती वारंवार बिघडत आहे. त्यामुळे त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी असा अर्ज न्यायालयात करण्यात आला होता. यावर न्यायालयाने निकाल दिला आहे.
💐 बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी यांचं निधन :
थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या त्या आत्या तर चित्रपट सेनेच्या पदाधिकारी कीर्ती फाटक यांच्या त्या मातोश्री होत्या.
No comments:
Post a Comment