येवला तालुक्यातील कातरणी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा - latur saptrang

Breaking

Friday, May 13, 2022

येवला तालुक्यातील कातरणी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा



 येवला तालुक्यातील कातरणी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.


या सोहळ्यात शंकराचार्य कृष्णदेवानंदगिरीजी महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन स्थानिक ग्रामस्थांनी केले होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पहार देऊन महाराजांचे स्वागत केले.


यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, जिल्हा नियोजन समिती सदस्य ज्ञानेश्वर शेवाळे, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment