कोरोना वाढतोय, मास्क वापरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - latur saptrang

Breaking

Thursday, May 26, 2022

कोरोना वाढतोय, मास्क वापरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 26 :- कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले.  राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी 1.59 टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी  आढळते.   मुंबईत रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये 27.92 टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात 18.52 टक्के 68.75 टक्के इतकी वाढ झाली आहे.

सध्या केवळ एक रुग्ण व्हेटिलेटरवर असून 18 रुग्ण ऑक्सिजनवर आहे.  रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी असली तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही हे लक्षात घेऊन सर्वांनी सावधगिरी बाळगणे आणि त्यासाठी मास्क घालत राहणे, लस घेणे आवश्यक आहे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.  सध्या 18 पेक्षा अधिक वयाच्या 92.27 टक्के लोकांना एक डोस देण्यात आला आहे.  चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले असून ते वाढविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

—–०—–



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2xOkmKV
https://ift.tt/dVQz2lX

No comments:

Post a Comment