दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
🌧️ राज्यात पुढील चार दिवस पाऊस
नुकतंच अंदमानात मोसमी पावसाचे (नैर्ऋत्य मोसमी वारे) आगमन झालं. सहा दिवस आधीच मोसमी पाऊस अंदमानात पोहोचला आहे. परिणामी महाराष्ट्रात देखील नैर्ऋत्य मोसमी वारे लवकरच धडकण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, येत्या तीन ते चार दिवस राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
⚖️ केतकीला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकीला ठाणे सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महत्वाची बाब म्हणजे ठाण्याच्या सत्र न्यायालयात केतकीच्या सुनावणीवेळी गोरेगाव पोलीस देखील तिचा ताबा घेण्यासाठी पोहोचले आहेत.
💁♂️ राज्यातील 11 जिल्ह्यातून कोरोना हद्दपार
कोरोना परतीच्या वाटेवर असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे राज्यातील 11 जिल्ह्यातून कोरोना हद्दपार झाला आहे. प्रतिबंधित लसीकरण सुरु होण्यापूर्वी बहुतेक जिल्ह्यांमधील मृत्यूदर चिंताजनक होता. तिसऱ्या लाटेत ही चिंता दूर झाली आणि कोरोनापासून दिलासा मिळाला.
😎 ...आणि हार्दिक पटेल यांचा पक्षाला रामराम!
काँग्रेसचे गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल यांनी अखेर पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी आज धाडस करून काँग्रेसच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, अशी माहिती हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरून दिली आहे.
🎯 राजीव गांधी हत्येप्रकरणी मोठा निर्णय!
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषींपैकी एक ए. जी. पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पेरारिवलनची मुदतपूर्व सुटका करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.
नवनविन बातम्या व माहितीसाठी आजच लिंक करा !
No comments:
Post a Comment