हरभऱ्याची खरेदी २८ जून पर्यंत वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरु - latur saptrang

Breaking

Thursday, May 26, 2022

हरभऱ्याची खरेदी २८ जून पर्यंत वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरु

मुंबई, दि. 26 :  या हंगामात हरभऱ्याच्या एकरी उत्पादनात वाढ झाली असून 32.83 लाख मे. टन अपेक्षित उत्पादन असताना 8.20 लाख मे. टन एवढे वाढीव उत्पादन होत आहे. यामुळे हरभऱ्याची खरेदी 28 जून 2022 पर्यंत वाढविण्यासाठी केंद्र शासनाला विनंती करण्यात आली असून त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे.  हरभऱ्याच्या खरेदीचा अंतिम दिनांक 29 मे 2022 असून ही तारीख वाढविण्यास एक-दोन दिवसात मंजुरी अपेक्षित आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाला सांगितले.

सध्या हरभऱ्याचे बाजारभाव 4500-4800 रुपये प्रती क्विंटल आहे.  गेल्या हंगामात हरभऱ्याच्या लागवडीखालील क्षेत्र 22.31 लाख हेक्टर व एकूण उत्पादन 23.97 लाख मे. टन इतके होते.  सध्या सरासरी एकरी उत्पादन 1158 क्विंटल प्रती हेक्टर असे आहे.

—–०—–



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/hqvbynY
https://ift.tt/dVQz2lX

No comments:

Post a Comment