सर्व पंचायत समित्यांच्या 132 जागांच्या* *निवडणुकांकरिता प्रभागाच्या भौगोलिक सिमा - latur saptrang

Breaking

Wednesday, June 1, 2022

सर्व पंचायत समित्यांच्या 132 जागांच्या* *निवडणुकांकरिता प्रभागाच्या भौगोलिक सिमा

 *सर्व पंचायत समित्यांच्या 132 जागांच्या*

*निवडणुकांकरिता प्रभागाच्या भौगोलिक सिमा निश्चितीचा कार्यक्रम जाहीर*

        *लातूर,दि.1(जिमाका):-*मा.राज्‍य निवडणुक आयेागाच्या आदेशान्‍वये दिलेल्‍या  कार्यक्रमांनुसार लातूर जिल्‍हयातील जिल्‍हा परिषदेच्‍या 66 जागा व त्‍याअंतर्गत असलेल्‍या सर्व पंचायत समित्‍यांच्‍या  132 जागांच्‍या निवडणुकांकरिता प्रभागाच्‍या भौगोलिक सिमा निश्चित करणेबाबतचा कार्यक्रम दिलेला आहे. त्‍यानुसार दिनांक 02 जून 2022 रोजी प्रारुप प्रभाग रचनेची अधिसुचना प्रसिध्‍द करण्यात येणार आहे. सदरील अधिसुचना ही महाराष्‍ट्र  जिल्‍हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 (1962 चा अधिनियम (5) चे कलम 12 पोटकलम (1) अन्‍वये लातूर जिल्‍हयातील जिल्‍हाधिकारी कार्यालय लातूर, जिल्‍हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालय, सर्व तहसिल कार्यालय, सर्व पंचायत समिती कार्यालय येथील फलकावर पाहण्‍यासाठी उप‍लब्‍ध केलेली आहे.    

या प्रारुप प्रभाग रचनेवर काही हरकती व सुचना असल्‍यास त्‍या दि.02 जून 2022 ते दि.08 जून 2022 या कालावधीत जिल्‍हाधिकारी कार्यालय, लातूर येथे ग्रामपंचायत निवडणुक शाखेत सादर करता येतील, तसेच प्रारुप प्रभाग रचनेचे अवलोकन सर्व संबंधितानी करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी लातूर यांच्या तर्फे करण्‍यांत येत आहे.

No comments:

Post a Comment