भारतावर पुन्हा कोरोनाचं संकट; 24 तासांत 11,739 नवे रुग्ण
देशात सक्रिय रुग्णांची संख्या 92 हजारांच्या पुढं
भारतात सक्रिय रुग्णांची संख्या 92 हजारांच्या पुढं गेलीय. आज कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 92,576 आहे. आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, एकूण संसर्गांपैकी 0.21 टक्के सक्रिय प्रकरणं आहेत, तर देशातील कोरोना बरं होण्याचं प्रमाण 98.58 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
आकडेवारीनुसार, देशातील दैनंदिन सकारात्मकता दर (Positivity Rate) 2.59 टक्के नोंदवला गेलाय. साप्ताहिक सकारात्मकता दर 3.25 टक्के नोंदवला गेला. दरम्यान, कोरोना मृत्यू दर 1.21 टक्के नोंदवला गेला आहे. देशात आतापर्यंत 5,24,999 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर, देशातील कोरोना संसर्गाची एकूण संख्या 43.39 दशलक्षांवर पोहोचलीय.
देशातील कोरोना लसीकरणाचा आकडा किती?
सध्या देशात कोरोना लसीकरणाचा आकडा 1,97, 08, 51,580 आहे. गेल्या 24 तासांत 12 लाख 72 हजार 739 लसीचे डोस देण्यात आले आहेत. भारतातील कोविड संख्या 19 डिसेंबर 2020 रोजी एक कोटीचा टप्पा ओलांडली होती. हा आकडा 4 मे रोजी दोन कोटी आणि गेल्या वर्षी 23 जून रोजी तीन कोटींच्या पुढं गेला होता. यावर्षी 25 जानेवारी रोजी भारतातील कोविडची संख्या चार कोटींचा टप्पा ओलांडलीय.
No comments:
Post a Comment